महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Drugs Gang Busted In Delhi : अफगाणिस्तानातून कच्चा माल आणून बनवत होते ड्रग्ज, पोलिसांनी केला मोठ्या टोळीचा पर्दाफाश - अफगाणिस्तानातून कच्चा माल आणून ड्रग्ज व्यापार

फॅक्टरीत जीन्स बनवण्याच्या नावाखाली अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या अमली पदार्थ तस्करांचे जाळे अफगाणिस्तानपासून दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशापर्यंत पसरले आहे.

Drugs Gang Busted In Delhi
दिल्लीत अमली पदार्थ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By

Published : Apr 5, 2023, 7:50 PM IST

फॅक्टरीत जीन्स बनवण्याच्या नावाखाली करत होते अमली पदार्थांचा व्यापार

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सात जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अंमली पदार्थ निर्मिती आणि काळाबाजार करणाऱ्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. तपासादरम्यान, दिल्लीच्या मौजपूर आणि जाफ्राबादमध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून 7 आरोपींना अटक केली. त्यापैकी एक अफगाण नागरिक आहे. या अमली पदार्थ तस्करांचे जाळे देशभरात पसरले आहे. आरोपींकडून पोलिसांनी साडेआठ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत.

अफगाणिस्तानातून यायचा कच्चा माल : गुन्हे शाखेचे विशेष सीपी रवींद्र सिंह यादव यांनी सांगितले की, या टोळीत सहभागी असलेला अफगाण नागरिक अमली पदार्थ बनवण्यासाठी अफगाणिस्तानातून कच्चा माल आणत असे. हा कच्चा माल कंटेनर, कुरिअर आणि औषधांच्या पॅकेटमध्ये यायचा. कपड्यांबरोबरच हा कच्चा मालही टोमॅटो केचपच्या पाऊचमध्ये यायचा. या मालाची प्रत हवालामार्फत पाठवण्यात आली होती.

तस्करांचे पंजाबशी संबंध :या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पंजाबमधूनही दोघांना अटक केली आहे. हे तस्कर पंजाबमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करायचे. पोलिसांनी अद्याप या दोघांची नावे उघड केलेली नाहीत. या दोघांच्या शोधासाठी पंजाबसह देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लवकरच या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार आहे. पोलिसांनी सांगितले की, मौजपूर आणि जाफ्राबादच्या कारखान्यांमध्ये जीन्स बनवण्याच्या नावाखाली ड्रग्स बनविले जायचे. कपड्याच्या जीन्सच्या डाईंगला वापरल्या जाणाऱ्या अनेक केमिकल्सच्या वासामुळे ड्रग्जचा वास येत नव्हता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी सांगितले की, एक दिवसापूर्वीच त्यांनी अमली पदार्थांची एक खेप पंजाबला पाठवली होती.

अमली पदार्थांची किरकोळ विक्री : घाऊक पुरवठ्यासोबतच आरोपी अमली पदार्थांची किरकोळ विक्रीही करत असे. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी दिल्लीच्या 'मजनू का टिला' येथून एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तसेच जुन्या दिल्लीत ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या नेहा आणि आशा नावाच्या दोन महिलांबाबतही पोलिसांना माहिती मिळाली आहे. या दोघीही अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :Pakistani Infiltrator : सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला गुजरातमध्ये अटक

ABOUT THE AUTHOR

...view details