महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'Pradhanmantri Sangrahalaya : पहिले तिकीट विकत घेत मोदींनी केले प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांनी 'प्रधानमंत्री संग्रहालय' (Pradhanmantri Sangrahalaya) येथे पहिले तिकीट खरेदी करत संग्रहालया'चे उद्घाटन केले दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम (Nehru Memorial Museum) आणि लायब्ररी कॉम्प्लेक्समध्ये हे संग्रहालय बनवण्यात आले आहे.

PM Modi
नरेंद्र मोदीं

By

Published : Apr 14, 2022, 11:45 AM IST

Updated : Apr 14, 2022, 11:52 AM IST

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री संग्रहालय' येथे पहिले तिकीट खरेदी करत संग्रहालयाचे उद्घाटन केले. दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी कॉम्प्लेक्समध्ये हे संग्रहालय बनवण्यात आले आहे. दिल्लीतील तीन मूर्ती भवन नेहरू मेमोरियल म्युझियम म्हणून ओळखले जात होते, ते आता पंतप्रधानांचे संग्रहालय म्हणून ओळखले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्याने बांधलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन केले. या संग्रहालयात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांचे जीवन तत्त्वज्ञान तपशीलवार ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयासाठी सुमारे २७१ कोटी रुपये खर्च आला आहे. 2018 मध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि चार वर्षांत ते तयार झाले. भारतीय राज्यघटनेलाही या संग्रहालयात स्थान देण्यात आले आहे.

Last Updated : Apr 14, 2022, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details