नवी दिल्ली : शहरात पेट्रोल आणि डिझेलची किंमत पुन्हा वाढली आहे. सध्या पेट्रोलसाठी एका लिटरमागे ९०.९९ रुपये मोजावे लागणार आहेत, तर डिझेल ८१.४२ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. गुरुवारपासून या किंमती लागू झाल्या आहेत.
बुधवारच्या तुलनेत पेट्रोल २५, तर डिझेल ३० पैसे प्रतिलिटरने महागल्याचे समजत आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तशाच आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल ९७.३४ रुपये प्रतिलिटर, आणि डिझेल ८८.४९ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. तसेच, चेन्नईमध्ये सध्या पेट्रोलची किंमत ९२.९० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलची किंमत ८६.३५ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ९१.१४ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ८४.२६ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.
हेही वाचा :इंदूरमध्ये कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे श्वानाला अटक!