नवी दिल्ली - देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. राज्यात पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल ३२ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल ८८.७३ तर डिझेलचे दर ७९.०६ प्रति लिटर झाले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर अधिभार लावण्याची घोषणा केली. त्यानुसार कृषी पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी पेट्रोलवर प्रति लिटर अडीच रुपये तर डिझेलवर ४ रुपये अधिभार लावण्याची तरतूद केली. मागील सहा दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमती सलग वाढत असल्याने जनतेतून असंतोष व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी या दरवाढीचा विरोध केला आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या रोजच्या दरानुसार इंधनाच्या किमती बदलत असतात.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील इंधनाचे नवे दर (प्रतिलिटर) -
मुंबई-
पेट्रोल 95. 21 प्रती लिटर. डीझेल दर 86.04 प्रती लिटर
जळगाव-
पेट्रोल 96.27 रुपये डिझेल 85.76 रुपये
अमरावती
पेट्रोल- 96.30 डिझेल-85.50
अहमदनगर-