नवी दिल्ली - उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचाराच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी देवांगना कालिता, नताशा नरवाल आणि जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचा विद्यार्थी आसिफ इकबाल यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. तुरुंगात असताना प्रचंड पाठिंबा मिळाला असून संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विद्यार्थी कार्यकर्त्या नताशा नरवाल म्हणाल्या.
दिल्ली दंगल : तिहार तुरुंगातून विद्यार्थी कार्यकर्ते देवांगना, नताशा, आसिफची सुटका - नताशा
दिल्ली हिंसा प्रकरणात अटकेत असलेल्या जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी देवांगना कालिता, नताशा नरवाल आणि जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचा विद्यार्थी आसिफ इकबाल यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. तुरुंगात असताना प्रचंड पाठिंबा मिळाला असून संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विद्यार्थी कार्यकर्त्या नताशा नरवाल म्हणाल्या.
न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती ए.जे. भंभानी यांच्या खंडपीठाने या तिघांचाही जामीन मंजूर केला आहे. 50 हजारांच्या जामीनावर या तिघांचीही सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणाची सुनावणी करताना दिल्ली न्याायलायने सरकारला फटकारले. निदर्शनं करण्याचा अधिकार, निषेध करण्याचा मूलभूत हक्क आणि दहशतवादी कारवायांमध्ये एक पुसटशी रेषा आहे. त्यामुळे निषेध करणं हा दहशतवाद नाही. जर सरकार मुलभूत हक्क आणि दहशतवादी कारवाया यांच्यामध्ये फरक करुन शकत नसेल तर भविष्यात लोकशाहीवर वाईट दिवस येतील, असे न्यायालयान नमूद केले.
विशेष म्हणजे, 24 फेब्रुवारी 2020 रोजी, उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामध्ये कमीतकमी 53 लोक ठार आणि 200 जण जखमी झाले होते. या तिघांवर दंगलीचे मुख्य ‘षडयंत्रकारी’ असल्याचा आरोप आहे. दरम्यान, या तीघांना दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर या आदेशाविरोधात दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे.