महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतात फाशीवर बंदी आणावी - ए.पी. सिंह - विधीज्ञ एम.पी. सिंह बातमी

तुरुंगामध्ये फाशीगृह नाही तर सुधारणागृह असावे. देशातील फाशीवर बंदी घालण्याची मागणी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींचे वकील ए.पी.सिंह यांनी केली.

delhi-nirbhaya-case-accused-advocate-demands-to-finish-hanging-punishment
संपादित छायाचित्र

By

Published : Mar 20, 2021, 10:12 PM IST

नवी दिल्ली -निर्भया कांडातील चार नरधमांच्या फाशीला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. 20 मार्च, 2020 रोजी सकाळी 5.30 वाजता निर्भया कांडातील चारही आरोपींना फासावर लटकविण्यात आले होते. तिहार कारागृहात एकाचवेळी चौघांना फाशी देण्याची ती पहिलीच वेळ होती. याच पार्श्वभूमीवर दोषींचे वकील ए.पी. सिंह यांनी वर्षभरात महिला अत्याचार व हत्येच्या घटना कमी झाल्या का, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी भारतात फाशीवर बंदी आणण्याची मागणी केली. कारागृह हे फाशीगृह न बनता सुधारगृह बनावित, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

बोलताना विधीज्ञ

फाशीतून सिद्ध काय झाले ..?

अक्षयला एक लहान बाळ होता. विनयवर त्याच्या बहिणींच्या लग्नाची जबाबदारी होती. पवनचे आई-वडिल वृद्ध आहेत. मुकेशच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने तो त्याच्या आईचा एकच सहारा होता. या फाशीतून काय सिद्ध झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

फाशीची शिक्षा संपुष्टात आणावी -

शेकडो देशांमध्ये फाशीची शिक्षा संपुष्टात आली आहे. त्यामुळे, फाशीची शिक्षा भारतातही रद्द केली जावी, आरोपींना सुधारण्याची संधी मिळायला हवी, असे वकील ए.पी. सिंह म्हणाले. मोठ्या न्यायाधीशांनी आणि माजी न्यायाधीशांनीही फाशी योग्य असल्याचे मान्य केले नाही. फाशी दिल्याने सुधारण्याची संधी मिळत नाही. गेल्या एका वर्षात महिला अत्याचाराबातच्या गुन्ह्यात सुधारणा झालेली नाही. गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे, असेही ते म्हणाले.

पुरुष आयोग तयार करावा

कोणीही पुरुषांचे ऐकत नाही. म्हणूनच पुष्कळ संस्था पुरुष आयोग तयार करण्याची मागणी करतात. महिला डेस्क, महिला पोलीस स्टेशन, महिला आयोग, महिला मंत्रालये, महिला न्यायालये आहेत. पण, पुरुषांसाठी काहीच व्यवस्था नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा -निर्भया कांडातील चौघांच्या फाशीला आज एक वर्ष पूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details