नवी दिल्ली : शाहबाद डेअरी परिसरात तरुणीच्या करण्यात आलेल्या हत्येने देशभर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याला दोन दिवस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता तरुणी अल्पवयीन असल्याने लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार ( पोक्सो ) गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी पोक्सो गुन्हा दाखल केला नव्हता, मात्र राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पथकाने या तरुणीच्या घरी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ही बाब उघड झाली. त्यामुळे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग पोलिसांना पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पथकाने घटनास्थळाचे निरीक्षण करुन लोकांशी विचारपूस केल्याचे स्पष्ट केले. त्याआधारे या प्रकरणात पॉक्सो कलमही लावायला हवे होते, असे समोर आले आहे. पोलिसांनी POCSO कलम लावलेले नाही. दिल्ली पोलिसांना पोक्सोची कलमे लावण्यासाठी नोटीस पाठवली जाईल. - प्रियांका कानुंगो, चेअरमन एनसीपीसीआर
सदस्यांनी पीडितेच्या घरी जाऊन पालकांची घेतली भेट :शाहबाद डेअरी परिसरात अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. आता या प्रकरणात POCSO चे कलम देखील लावले जाऊ शकते. बुधवारी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) च्या टीमने शाहबाद डेअरी परिसरातील पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या पालकांची भेट घेतली. NCPCR टीमने तेथे बराच वेळ थांबून संपूर्ण परिसरातील लोकांशी संवाद साधला. मुलीची हत्या झालेल्या घटनास्थळीही राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पथक गेले होते.
तरुणी अल्पवयीन असल्याने लागणार पोक्सो कलम :राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी NCPCR चेअरमन प्रियांका कानुंगो यांनी पथकाने घटनास्थळाचे निरीक्षण करुन लोकांशी विचारपूस केल्याचे स्पष्ट केले. त्याआधारे या प्रकरणात पॉक्सो कलमही लावायला हवे होते, असे समोर आले आहे. पोलिसांनी POCSO कलम लावलेले नाही. दिल्ली पोलिसांना पोक्सोची कलमे लावण्यासाठी नोटीस पाठवली जाईल, असेही कानुंगो यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात POCSO कायद्याचे उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे. मात्र, कोणत्या आधारावर पॉक्सो लावला जाईल आणि कोणती कलमे जोडली जातील, असेही त्यांना विचारले. यावेळी त्यांनी पोलिसांना नोटीस पाठवून माहिती घेतली जाईल. त्यासह शवविच्छेदन अहवालही घेतला जाईल, असे कानुंगो यांनी यावेळी स्पष्ट केले.
बोलणे बंद केल्यानंतर साहिल करायचा पाठलाग :साहिल खानच्या हल्ल्यात मारलेली तरुणी अल्पवयीन होती. तिचे वय 16 वर्षाचे असल्याची माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पथकाने दिली. तीन वर्षांपासून ही तरुणी साहिल खानशी बोलत असल्याचे तपासात समोर आले आहे. म्हणजेच त्यावेळी पीडितेचे वय 14 वर्षे असेल. जेव्हापासून तिने साहिलशी बोलणे बंद केले तेव्हापासून तो तिचा पाठलाग करत असल्याची माहिती पीडितेच्या एका मित्राने दिली. याशिवाय अशी अनेक कारणे आहेत, ज्यांच्या आधारे POCSO कलम लावले जाऊ शकतात. पीडिता तिच्या मैत्रिणीच्या घरी राहत होती की तिच्या घरी खोटे बोलून साहिलसोबत राहत होती, याबाबतही पथक तपास करत आहे. मात्र असे आढळून आले तरी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहितीही यावेळी पथकाने दिली.