महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Delhi Murder Case : अल्पवयीन मुलीच्या हत्येशी संबंधित आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर - NEW VIDEO RELATED TO MURDER

दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात अल्पवयीन मुलीच्या हत्येशी संबंधित आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. खून करण्यापूर्वी आरोपी तरुणीला भेटण्यासाठी त्याच ठिकाणी आला होता. तो तिची वाट पाहत आहे असे फुटेजध्ये दिसत आहे.

Delhi Murder Case
Delhi Murder Case

By

Published : May 30, 2023, 7:47 PM IST

दिल्लीतील हत्तेचे सीसीटीव्ही फुटेज

नवी दिल्ली :राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात तरुणीच्या हत्येप्रकरणी एकामागून एक नविन खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणाशी संबंधित आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, खून करण्यापूर्वी आरोपी साहिल मुलीला भेटण्यासाठी त्याच ठिकाणी आला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा सातत्याने तपास करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद : सीसीटीव्ही फुटेजमध्ये निळा टी-शर्ट घातलेला आरोपी साहिल दिसत आहे. ज्या ठिकाणी मुलीची हत्या करण्यात आली होती, त्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून ते मुलीसह आरोपीला येथे एकत्र पाहत होता. दोघांमध्ये घट्ट मैत्री दिसून येत होती. मात्र, तेथे ना मुलीचे घर होते ना आरोपी मुलाचे घर होते, असेही शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांची दोघांचीही घरं इथून खूप दूर आहेत. असे असतानाही तो अनेकदा या उद्यानात रात्री उशिरापर्यंत नागरिकांना दिसायचा असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

आरोपीला फाशी झालीच पाहिजे : अल्पवयीन मुलाच्या पालकांनी आरोपीला खून केल्याप्रकरणी फाशी देण्याची मागणी केली आहे. आमची एकच मागणी आहे की त्याला फाशी झालीच पाहिजे. जशी माझी मुलगी मेली आहे, तशीच त्यालाही शिक्षा द्या अशी त्यांनी मागणी केली आहे. त्याचवेळी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मंगळवारी १६ वर्षीय मुलीच्या घरी जात मुलीच्या पालकांची भेट घेतली.

निःपक्षपातीपणे तपास करा :यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, आरोपीने मुलीची निर्घृण हत्या केली आहे, त्याला फाशी द्यावी. केंद्र सरकारने तातडीची बैठक बोलावून पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा पूर्ण निःपक्षपातीपणे तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्लीच्या एलजी, पोलिस आयुक्तांनाही बैठकीत बोलावण्यात यावे, असे त्या म्हणाल्या.

कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्न : महिला आयोगाच्या अध्यक्षा मालीवाल म्हणाल्या की, दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था खूप ढासळली आहे. मुली घराबाहेर पडायला घाबरत आहेत. दिल्ली पोलिसांनी या बाबत उपाय योजना करण्याची गरज आहे. पीडितेच्या कुटुंबाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी शासन, पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. विशेष म्हणजे रविवारी रात्री शाहबाद डेअरी परिसरात १६ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी हत्येतील आरोपीला बुलंदशहर येथील त्याच्या मावशीच्या घरातून अटक केली. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा -

Brutal Murder in Delhi : दिल्लीत तरुणीचा निर्घृण खून, नराधम उत्तर प्रदेशातील बुलंदशरहमधून जेरबंद

ABOUT THE AUTHOR

...view details