महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Satyendar Jain Massage Video Viral: तुरुंगात मसाज घेतानाचा मंत्री सत्येंद्र जैन यांचा व्हिडीओ व्हायरल; तुरुंग अधीक्षक निलंबित

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन (Delhi Govt Minister Satyendar Jain) जेलमध्ये मसाज घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Satyendar jain massage video in jail viral) झाला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला (BJP Spokesperson Shehzad Poonawala) यांनीस हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. मंत्र्यांनी लाच देऊन तुरुंगात या सुविधेचा लाभ घेतला. याप्रकरणी तुरुंग अधीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. Jail superintendent suspended, Delhi News, Satyendar Jain Massage Video Viral

Satyendar Jain Massage Video Viral
मंत्री सत्येंद्र जैन यांचा व्हिडीओ व्हायरल

By

Published : Nov 19, 2022, 12:25 PM IST

नवी दिल्ली :दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (Delhi Govt Minister Satyendar Jain) जेलमध्ये मसाज घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Satyendar jain massage video in jail viral) झाला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला (BJP Spokesperson Shehzad Poonawala) यांनी शनिवारी हा व्हिडिओ सार्वजनिक केला आहे. तत्पूर्वी, 14 नोव्हेंबर रोजी, दिल्ली सरकारचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी तुरुंगात आपला प्रभाव वापरल्याच्या आरोपांच्या चौकशीनंतर, तुरुंग क्रमांक 7 चे अधीक्षक अजित कुमार यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा आदेश जारी केला. Jail superintendent suspended, Delhi News, Satyendar Jain Massage Video Viral

मंत्री सत्येंद्र जैन तुरुंगात मसाज घेताना

तुरुंगात असताना करायचे प्रभावाचा वापर- या संदर्भात, ईडीने गेल्या महिन्यात न्यायालयात तक्रार केली होती की, सत्येंद्र जैन तुरुंगात असतानाही आपल्या प्रभावाचा गैरवापर करत आहेत आणि ते तुरुंगातील नियमांचे उल्लंघन करून सुविधांचा आनंद घेत आहेत. यासोबतच जैन प्रकरणाशी संबंधित लोकांना तुरुंगात टाकले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. त्याचा व्हिडिओ ईडीने कोर्टाकडे सोपवला होता.

मसाज व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद-यापूर्वी झालेल्या या आरोपानंतर भाजप नेत्याने उपराज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानंतर उपराज्यपालांनी दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते. यानंतर मुख्य सचिवांनी तपासाअंती कारागृह क्रमांक सातचे अधीक्षक अजित कुमार यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले होते. दुसरीकडे, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनी असेही म्हटले होते की, दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन हे तिहार तुरुंगात आपल्या प्रभावाचा गैरवापर करून सहआरोपींनाच भेटत नाहीत तर साक्षीदारांनाही भेटत आहेत. त्याला कारागृहात इतर सुविधाही दिल्या जात असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या संगनमतांशिवाय हे शक्य नाही, असे ते म्हणाले होते. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर तुरुंग कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आता केली आहे.

लाच देऊन तुरुंगातील सुविधांचा गैरफायदा -बिधुरी म्हणाले होते की, सत्येंद्र जैन अजूनही दिल्ली सरकारमध्ये मंत्री आहेत आणि 30 मे रोजी अटक होण्यापूर्वी त्यांनी आरोग्य आणि तुरुंग खात्याची जबाबदारीही सांभाळली होती. तुरुंगातील अधिकाऱ्यांशी त्यांचे पूर्वीचे संपर्क आहेत. ज्यांचा ते अवैध फायदा घेत आहे. कोट्यवधींची लाच देऊन तुरुंगातील सुविधांचा गैरफायदा घेणाऱ्या सुकेश चंद्रशेखरला करोडोंची फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरसारखेच हे प्रकरण असल्याचे ते म्हणाले होते. सत्येंद्र जैन आपल्या प्रभावाचा वापर करून सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यांनी साक्षीदारांसोबत केलेल्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज आणि सहआरोपींना भेटल्याची घटनाही न्यायालयाला देण्यात आली आहे.

प्रशासन दखल घेणार का ?
सत्येंद्र जैन हे तुरुंगात असतानाही याच पद्धतीने आपला प्रभाव वापरत आहेत. आरोग्य मंत्री असताना त्यांनी दिल्ली सरकारच्या लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमधून खोटे प्रमाणपत्र मिळवले होते. ज्यामध्ये त्यांची तब्येत बरी नसून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने केंद्र सरकारच्या लोहिया रुग्णालयाकडून असे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले असता ते प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details