महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MCD Election Result 2022: दिल्लीत भाजपचा धुव्वा.. आम आदमीचा महानगरपालिकेवर कब्जा - अरविंद केजरीवाल

दिल्लीसह संपूर्ण देशातीचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून ही लढत अगदी अटीतटीची सुरू होती. या निवडणुकीत मतमोजणीच्या उत्तरार्धात आम आदमी पक्षाने आघाडी मिळवली आणि ती अखेरपर्यंत टिकवली. दरम्यान, दिल्ली एमसीडीमधील सर्व २५० जागांचे निकाल दुपारी जाहीर झाले आहेत.

delhi mcd election 2022 results news bjp congress aap live updates 7 december 2022
दिल्लीत आम आदमी पक्षाची विजयाकडे वाटचाल.. भाजपचीही जोरदार लढत..

By

Published : Dec 7, 2022, 12:11 PM IST

Updated : Dec 7, 2022, 4:09 PM IST

नवी दिल्ली : MCD Election Result 2022: एमसीडी निवडणुकीत भाजप आणि आप यांच्यात लढत होती, या लढतीत काँग्रेस कुठेच दिसली नाही. मतमोजणीवेळी आप आणि भाजप हे दोघेही एमसीडी जिंकण्याचा दावा करत होते, पण शेवटी आम आदमी पार्टीने विजय मिळवला आहे.

या निकालांनुसार एकूण २५० जागा असलेल्या एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाने १३४ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाने १०४ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला केवळ ९ जागांवर विजय मिळाला. तर अपक्ष आणि इतरांच्या खात्यामध्ये केवळ ३ जागा गेल्या आहेत. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ४२.५ टक्के मते मिळाली. तर त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाला मिळाली आहेत. मात्र, एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्णपणे पानीपत झाले नाही एवढीच भाजपासाठी जमेची बाजू ठरली आहे.

दिल्ली महापालिकेत २००७ पासून भाजपाची सत्ता होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने २७० पैकी १८१ जागा जिंकल्या होत्या. तर आपने ४८ आणि काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीतील तीनही महानगरपालिकांचे एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका स्थापन केली होती. तसेच, वॉर्डची संख्या घटून २५० एवढी झाली होती.

Last Updated : Dec 7, 2022, 4:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details