हैदराबाद (तेलंगणा): Delhi Liquor Scam: दिल्ली दारूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर महेंद्रू याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रात ED Charge sheet आमदार कविता, खासदार मागुंता, श्रीनिवासुलू रेड्डी त्यांचा मुलगा राघव रेड्डी आणि अरबिंदो फार्माचे संचालक सरथचंद्र रेड्डी यांची नावे समोर आली MLA Kavitha MP Magunta and Sharat Chandra आहेत. त्यांच्यासोबत बोयनापल्ली अभिषेक, बुची बाबू आणि अरुण पिल्लई यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या समीर महेंद्रू, पी. सरचंद्र रेड्डी, बिनय बाबू, विजय नायर आणि बोयनापल्ली अभिषेक यांच्या जबाबाच्या आधारे ईडीने हे आरोपपत्र दाखल केले आहे. पाहुयात आरोपत्रातील महत्त्वाच्या बाबी..
इंडोस्पिरिट्स कंपनी, ज्यामध्ये मागुंता राघव रेड्डी आणि कविथल हे मूळ भागीदार आहेत, त्यांनी 14,05,58,890 दारूच्या बाटल्या विकल्या आणि रु. 192.8 कोटी कमावले. मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी, राघव रेड्डी, सरथ रेड्डी आणि के. कविता यांच्या नियंत्रणाखालील दक्षिण गटाने AAP नेत्यांसाठी विजय नायर यांना 100 कोटी रुपये दिले. दक्षिण गट आणि एपीपी नेत्यांमधील करारानुसार दक्षिण गटाने हे योगदान आगाऊ दिले. त्यामुळे साउथग्रुपला नको तो फायदा झाला.
देणगी स्वरूपात दिलेले रु. 100 कोटी वसूल करण्यासाठी IndoSpirit मधील 65% स्टेक साउथ ग्रुपला देण्यात आला. Indospirit मधील भागभांडवल अरुण पिल्लई आणि प्रेम राहुल यांच्या नावांसह साउथ ग्रुपने बेनामी प्रतिनिधी म्हणून नेले होते. या प्रकरणात सहभागी असलेल्या 36 जणांनी 170 फोन नष्ट केले.