नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होण्याच्या एक दिवस आधी, बीआरएस नेत्या के. कविता यांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करावे, अशी मागणी करत जंतरमंतरवर उपोषण केले. यामध्ये बीआरएस नेत्या के. कविता यांनी काँग्रेस वगळता 16 पक्षांना निमंत्रण पाठवले होते, त्यापैकी 12 पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दुसरीकडे भाजपने हा तपासावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
तरुण चुघ यांची टीका :भारतीय जनता पक्षाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले की, 'भ्रष्टाचार करून गरिबांची संपत्ती लुटल्यानंतर आता एजन्सी त्याच्या विरोधात काम करत असताना के. कविता नाटक करतेय. दिल्लीतील दारू माफियांशी संबंध असल्याने बीआरएस नेत्याला ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले जात असताना, आता ती विरोधी पक्षांसोबत नाटक करत असल्याचे भाजप नेत्याने सांगितले'.
रेकॉर्ड तपासण्याचा चुघ यांचा सल्ला : केवळ दोनच अधिवेशने उरली आहेत, या प्रश्नावर भाजप नेत्या के. कविता यांची मागणी आहे की, या दोन अधिवेशनात सरकारला हवे असल्यास हे विधेयक मंजूर करून घेऊ शकते. भाजपचे तेलंगणा प्रभारी तरुण चुघ म्हणाले की, 2014 पूर्वी त्यांचे वडील केंद्रात मंत्री होते, त्यांनी महिला आरक्षणासाठी किती वेळा त्यांच्या सरकारसमोर आवाज उठवला ते पाहण्यासाठी फक्त रेकॉर्ड पहा.