महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sulli Deals Case : मुस्लिम महिलांची लावायचा ऑनलाईन बोली, आता चालणार न्यायालयात खटला - सुल्ली डील्स

या अॅपद्वारे मुस्लिम महिलांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिलाव केला जायचा. या महिलांचे त्यांच्या परवानगीशिवाय फोटो काढले होते. पोलिसांनी 7 जुलै 2021 रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. (Sulli Deals case). (prosecution of accused in Sulli Deals case).

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 11, 2022, 3:30 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना (Delhi LG VK Saxena) यांनी 'सुल्ली डील्स' प्रकरणातील मुख्य आरोपींवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. (prosecution of accused in Sulli Deals case). सुल्ली डील्स प्रकरणात (Sulli Deals case) मुस्लिम महिलांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला होता. ओमकारेश्वर ठाकूर यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 196 अंतर्गत खटला चालवला जाईल. हे कलम राज्याविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी आणि गुन्हेगारी कट रचण्याशी संबंधित आहे. मात्र या कलमाखाली आरोपींवर खटला चालवण्यासाठी पोलिसांना एलजीची परवानगी आवश्यक आहे.

मुस्लिम महिलांचा सोशल मीडियावर लिलाव : ठाकूर यांनी कथितपणे मुस्लिम समुदायाचा अपमान करण्याच्या उद्देशाने सुल्ली डील्स अॅप आणि सुल्ली डील्स ट्विटर हँडल तयार केले होते. या अॅपद्वारे मुस्लिम महिलांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिलाव केला जायचा. या अॅपवर शेकडो मुस्लिम महिलांना मोबाईल ऍप्लिकेशनवर लिलावा साठी सूचीबद्ध करण्यात आले होते. या महिलांचे त्यांच्या परवानगीशिवाय फोटो काढले होते. पोलिसांनी 7 जुलै 2021 रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. एलजीचे असे मत आहे की, आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी खटला तयार केला गेला आहे, म्हणून त्याच्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सुल्ली डील्सच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details