नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) पीठाने अभिनेता सुशांतसिंह राजपूतवरील (Actor Sushant Singh Rajput) डॉक्यूमेंट्री फिल्म तयार करण्याची स्थगिती देण्याची याचिका अमान्य केली आहे. न्यायमूर्ती अनूप जयराम भांभानी यांच्या अध्यक्षतेखालील सुट्टीकालीन पीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी २५ जूनला करण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.
सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीची काय घाई आहे, असा प्रश्न याचिकर्त्याला विचारला. जे चित्रपट यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत, त्यांचे प्रदर्शन आम्ही थांबवू शकतो का? असा प्रश्नही उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला.
हेही वाचा-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
सुशांतसिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांच्यावतीने जयंत मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला सांगितले, की आमच्या माहितीप्रमाणे सुशांतसिंह यांच्यावरील सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. वकील वेदांत वर्मा यांनी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर ११ जूनला प्रदर्शित झाल्याचे सांगितले. न्याय सिनेमाचे निर्माता सरला सरावगी यांचे वकील चंदर लाल यांनीही सिनेमा प्रदर्शित झाल्याचे सांगितले. वरिष्ठ वकील हरीष साळवे यांनी २४ जूनवर सुनावणी करण्याची मागणी केली. न्यायालयाने २५ जूनला सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा-अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश