नवी दिल्ली : मद्य घोटाळ्यात कारागृहात असलेले मनीष सिसोदिया यांना आज त्यांच्या पत्नीला भेटता येणार आहे. दिल्ली न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पत्नीच्या भेटीला परवानगी दिली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पत्नीला भेटता येणार आहे. न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी तब्बल सात तासाचा वेळ दिला आहे. मात्र या वेळेत मनीष सिसोदिया यांना कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रीक साधने वापरता येणार नाहीत.
मनीष सिसोदियांना वापरता येणार नाही फोनसह इंटरनेट :मद्य घोटाळ्यात कारागृहात असलेले आपचे नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी परवानगी दिली आहे. याबाबतची याचिका मनीष सिसोदिया यांच्यावतीने दिल्ली न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर दिल्ली न्यायालयाने पोलिसांना मनीष सिसोदिया यांना सात तास त्यांच्या प्तनीला भेटण्यासाठी परवानगी दिल्याचे स्पष्ट केले. या दरम्यान मनीष सिसोदिया हे त्यांच्या पत्नीला भेटू शकतात. मात्र यावेळी दिल्ली न्यायालयाने काही बंधने घालून दिली आहेत. या सात तासात मनीष सिसोदिया यांना फोन आणि इंटरनेट सुविधा वापरता येणार नाहीत.
सीबीआयच्या प्रकरणात जमानत अर्ज फेटाळला : मनीष सिसोदिया यांच्यावतीने अंतरीम जामीन अर्ज मिळावा म्हणून दिल्ली न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र दिल्ली न्यायालयाचे न्यायमूर्ती डी के शर्मा यांनी ईडीला शनिवारी सायंकाळपर्यंत एक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली न्यायालयाने सीबीआय प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळल्याने त्याची सुनावणी चार जुलैला ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिल्ली न्यायालयाने मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांची पत्नीला भेटण्यासाठी परवानगी देण्याची मागणी मान्य केली आहे.
पत्नीची प्रकृती खराब असल्याने केला जामीन अर्ज : मनीष सिसोदिया यांच्या प्तनीची प्रकृती खराब असल्याने त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीनासाठी अर्ज सादर केला होता. मनीष सिसोदिया यांच्या पत्नीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचे त्यांच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आले. पत्नीच्या प्रकृतीमुळे वैद्यकीय कारण देत मनीष सिसोदिया यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.
हेही वाचा -
- Manish Sisodia Bail : मनिष सिसोदियांना दिल्ली हायकोर्टाचा झटका, जामीन नाकारला
- Delhi Liquor Scam : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सिसोदिया यांना मोठा धक्का! कोर्टाने 23 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली