महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Markaz Nizamuddin Reopen : निजामुद्दीन मरकझ सुरू करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाची परवानगी - दिल्ली उच्च न्यायालय निजामुद्दीन मरकझ

निजामुद्दीन इमारतीमधील मरकझ मेळावे पुन्हा सुरू (Markaz Nizamuddin open) करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) आज परवानगी दिली आहे. शब-ए-बरातसाठी मरकझ निजामुद्दीन इमारतीतील मशिदीचे चार मजले पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे.

delhi high court
दिल्ली उच्च न्यायालय

By

Published : Mar 16, 2022, 6:43 PM IST

नवी दिल्ली - निजामुद्दीन इमारतीमधील मरकझ मेळावे पुन्हा सुरू (Markaz Nizamuddin open) करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) आज परवानगी दिली आहे. शब-ए-बरातसाठी मरकझ निजामुद्दीन इमारतीतील मशिदीचे चार मजले पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच मशिदीतील नमाजांच्या संख्येवरील सर्व निर्बंधही न्यायालयाने उठवले आहेत. याच ठिकाणी मार्च 2020 मध्ये कोरोना सुरुवातीच्या काळात तबलीगी जमातने (Tablighi Jamaat) बैठक घेतली होती. तेव्हापासून कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे कथित उल्लंघन केल्यामुळे मरकझला कुलूप लावले होते.

काय आहे प्रकरण?

मरकझमध्ये 2020 मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनला. या प्रकरणात मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकझमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती.

लोकांच्या उपस्थिती मर्यादेवर न्यायालयात युक्तिवाद -

15 मार्चला दिल्ली पोलिसांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या विनंतीनुसार, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नमाजासाठी इमारत पुन्हा उघडण्याची परवानगी दिली, परंतु एसएचओ निजामुद्दीन यांनी काही अटी घातल्या, त्यापैकी संख्या 100 पेक्षा कमी करणे ही एक होती. मात्र, लोकांच्या संख्येवर मर्यादा घालण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. यावर न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी म्हणाले, लोकांच्या संख्येवर काही निर्बंध आहे का? संख्येवर बंदी कुठे आहे? जेव्हा मरकझचे अधिकारी कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आश्वासन देत आहेत, त्यांना ते एकदा करू द्या. म्हणजे लोकांच्या उपस्थितीवर कोणतेही निर्बंध नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details