नवी दिल्ली Delhi Fog :राजधानी दिल्लीत थंडीच्या कडाक्यानं नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. दुसरीकडं दाट धुक्यामुळं दिल्लीतून उड्डाण करणारी 30 विमानं उशीरानं निघाली आहेत. तर तब्बल 17 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. दाट धुक्याचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला. त्यामुळं रेल्वे उशीरानं धावत आहेत. दिल्लीतील किमान तापमान 5 अंशावर नोंदवलं गेलं आहे. त्यामुळं नागरिकांचा चांगलाच संताप होत आहे.
दाट धुक्याचा दृश्यमानतेवर परिणाम :दिल्लीसह उत्तर भारतात थंडीमुळं दाट धुकं पसरलं आहे. दाट धुक्याचा परिणाम दृश्यमानतेवरही झाला आहे. त्यामुळं दिल्लीतून उड्डाण करणारी तब्बल 17 विमानं रद्द करण्यात आली आहेत. तर 30 विमानं उशीरानं उड्डाण करत आहेत. याबाबत वृत्तसंस्थेला बोलताना एका प्रवाशानं सांगितलं की, "माझी फ्लाईट सकाळी 8.40 वाजता निघणार होती. मात्रत्र आता फ्लाईटची वेळ 10.30 करण्यात आली आहे. दाट धुक्यामुळं विमान उड्डाणास उशीर होत असल्याचं कारण विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलं आहे." याबाबत बोलताना दुसऱ्या प्रवाशानं वृत्तसंस्थेला सांगितलं की, "दिल्ली विमानतळानं एक अॅ़व्हायझरी जारी केली आहे. कमी दृश्यमानता असल्यानं विमान उड्डाणावर त्याचा परिणाम होत आहे. विमान उड्डाण उशीरा होत असल्यानं संबंधित विमान प्राधिकरणासोबत संपर्क करण्यास सांगितलं आहे."