नवी दिल्ली : भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी कविता मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. के. कविता या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि विधान परिषदेच्या सदस्या आहेत. त्या आज सकाळी 11.30 वाजता ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.
कविता यांनी काही महिन्यांत 10 फोन बदलले : कविता आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाल्या होत्या. जुना फोन घेऊन त्या आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्या तो फोनही तेथील उपस्थित माध्यमांना दाखवला. ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, कविता यांनी काही महिन्यांत 10 फोन बदलले आहेत. दरम्यान, कविता यांनी दारू प्रकरणाचे पुरावे असलेले फोन नष्ट केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे कविताने म्हटले : याआधी 11 आणि 20 मार्च रोजी ती मध्य दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात त्यांची सुमारे 18-19 तास चौकशी झालेली आहे. सोमवारी, बीआरएस नेते रात्री 9:15 च्या सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल चौकशीदरम्यान त्यांना सुमारे डझनभर प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले हैदराबादचे उद्योगपती अरुण रामचंद्र पिल्लई यांच्या वक्तव्याबाबत कविता यांचीही चौकशी करण्यात आल्याचे समजते. पिल्लई कविताच्या चांगल्या संपर्कात असल्याची माहिती आहे. दरम्यान, आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे कविताने म्हटले आहे.