महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Delhi Crime News : इंजिनियरच्या घरी चोरी करायला गेले आणि 500 रुपये देऊन आले, वाचा काय आहे प्रकरण

राजधानी दिल्लीत चोरीची अजब घटना समोर आली आहे. येथे एका घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्यांना घरात काहीच मिळाले नाही. त्यामुळे चोरटे घरातून जाताना दारात 500 रुपयांची नोट ठेवून गेले.

By

Published : Jul 24, 2023, 4:13 PM IST

Delhi Crime News
दिल्ली क्राईम न्यूज

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील रोहिणी परिसरात चोरट्यांनी एका अभियंत्याच्या घरात चोरी करण्यासाठी प्रवेश केला होता. मात्र घरात कोणतीही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चोरटे रिकाम्या हाताने परत गेले. मात्र जाण्यापूर्वी त्यांनी घराच्या दारात 500 रुपयांची नोट ठेवली. ही घटना घडली तेव्हा पीडित व्यक्ती घरी नव्हती. ते परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले, मात्र घरातून एकही वस्तू गायब झालेली नव्हती.

चोरट्यांनी घरातून काहीही नेले नाही : रोहिणी परिसरात राहणारे सेवानिवृत्त अभियंता रामकृष्ण हे 19 जुलै रोजी सायंकाळी गुरुग्राम येथे त्यांच्या मुलाच्या घरी गेले होते. त्यांच्यासोबत त्याची पत्नीही होती. 21 जुलै रोजी सकाळी त्यांच्या शेजाऱ्याने फोन करून त्यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. ते घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. मात्र घरात गेल्यावर त्यांना समजले की, चोरट्यांनी घरातून काहीही नेले नाही.

प्रवेशदारावर 500 रुपयांची नोट सापडली : त्यानंतर पीडित रामकृष्ण यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र काहीही चोरीला गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घराच्या मुख्य दारात 500 रुपयांची नोट सापडल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी सांगितले की, घरातील कपाट फोडलेले नाही किंवा त्यात कुठलीही छेडछाड केलेली नाही.

घरात कोणतीही मौल्यवान वस्तू नव्हती : पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. रामकृष्ण यांनी पोलिसांना सांगितले की, त्याच्या घरात कोणतीही मौल्यवान वस्तू नव्हती. त्यामुळे चोरट्यांनी काही चोरी केली नसावी. मात्र, चोरट्यांनी घरात पाचशेची नोट का ठेवली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचा :

  1. Bihar Crime News : पतीला खुंटीला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार, दरवाजा तोडून घुसले होते बदमाश
  2. Nagpur Crime News : ऑनलाइन गेमचा नाद नको रे बाबा! नागपूरच्या व्यापाऱ्याने गमावले तब्बल 58 कोटी रुपये
  3. Mumbai Crime News: गुप्तचर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाची फसवणूक; चार कोटींना गंडा घालणारा गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details