नवी दिल्ली Delhi Crime News : राजधानी दिल्लीत दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी विनोद कश्यप उर्फ माता मसानी चौकी वाले बाबा याला पोलिसांनी अटक केली. एका महिलेचा त्रास कमी करण्याच्या नावाखाली या स्वघोषीत बाबानं 5 लाख रुपये घेतले. एक दिवस ती एकटी असताना तिच्यावर बलात्कार केला. या आरोपी बाबाचं वय ३३ वर्षे असून त्याचं एक यूट्यूब चॅनेल देखील आहे,
समस्या सोडविण्याच्या बहाण्यानं बोलावून बलात्कार : दिल्ली पोलिसांनी काल स्वयंभू बाबाला दोन महिला भाविकांच्या तक्रारींवरून लैंगिक छळाच्या दोन गुन्ह्यांप्रकरणी अटक केलीय. आरोपी विनोद हा दिल्लीतील काकरोळा भागात माता मसानी चौकी दरबार नावाचा दरबार चालवत होता. आरोपी विनोद कश्यपवर महिला भाविकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्यानं बोलावून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी 'गुरुसेवा' करायला सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगू नकोस, अशी धमकीही आरोपींनी महिलांना दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणी पोलिसांनी या स्वयंघोषीत बाबाविरोधात भादंवि कलम ३७६ आणि ५०६ अंतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत. या बाबाला पोलीसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करत आहेत.