नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने (Film Actress Jacqueline Fernandez) अबू धाबी, यूएई, नेपाळ आणि फ्रान्सला १५ दिवसांच्या तातडीच्या प्रवासासाठी पासपोर्ट जारी करण्याची मागणी आहे. जॅकलीनच्या अर्जावर दिल्ली न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून उत्तर मागितले आहे.
सुकेश चंद्रशेखरचा (Sukesh Chandrashekhar) समावेश असलेल्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग तपासात चौकशीसाठी ती यापूर्वी तपास संस्थेसमोर हजर झाली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी बुधवारी तपास एजन्सीकडून उत्तर मागितले. याची पुढील सुनावणी 18 मे 2022 ला होईल.
याचिकेत काय म्हटले आहे
फर्नांडीझ 2009 पासून भारतात राहणारी श्रीलंकेची नागरिक आहे. आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तिचे चांगले नाव आहे. जॅकलीनचे वकील अजित सिंग यांनी सांगितले की, ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे आणि सध्याच्या प्रकरणात अर्जदाराचे नाव आरोपी म्हणून दिले नाही. कोणतेही कारण न सांगता ईडीने अर्जदाराचा पासपोर्ट जप्त केला आहे.