महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बाटला हाउस प्रकरणातील आरोपी आरिज खानला फाशीची शिक्षा - batla house encounter

दिल्लीच्या साकेत न्यायालयाने बाटला हाउस प्रकरणातील आरोपी आरिज खान याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरिज खान याच्यावर पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येचा आरोप आहे. 2008 मध्ये बाटला हाउसमध्ये झालेल्या चकमकीत मोहनचंद शर्मा यांना विरमरण आले होते. मृत्यूदंडासोबतच त्याला 11 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

आरिज खानला फाशीची शिक्षा
आरिज खानला फाशीची शिक्षा

By

Published : Mar 15, 2021, 10:08 PM IST

नई दिल्ली -दिल्लीच्या साकेत न्यायालयाने बाटला हाउस प्रकरणातील आरोपी आरिज खान याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरिज खान याच्यावर पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येचा आरोप आहे. 2008 मध्ये बाटला हाउसमध्ये झालेल्या चकमकीत मोहनचंद शर्मा यांना विरमरण आले होते. मृत्यूदंडासोबतच त्याला 11 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. या रकमेपैकी 10 लाख रुपये शर्मा यांच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी ही शिक्षा सुनावली.

आरिज खान हा 13 वर्षांपूर्वी घडलेल्या बाटला हाऊस प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तसेच त्याच्यावर दिल्ली, अहमदाबाद, उत्तर प्रदेश आणि जयपूरमध्ये बॉम्बस्पोट घडवून आणल्याचा देखील आरोप आहेत. पोलिसांनी त्याच्यावर 15 लाखांचा इनाम ठेवला होता. अखेर 2018 साली त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरिज खान हा मुळचा उत्तर प्रदेशातील आजमगढचा रहिवासी आहे.

आरिज खानला फाशीची शिक्षा

काय आहे बाटला हाऊस प्रकरण

19 संप्टेबर 2008 मध्ये दिल्लीच्या जामिया नगर परिसरात असलेल्या बाटला हाऊसमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बाटला हाऊसवर छापा टाकला, या छाप्यात दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांना विरमरण आले होते. तर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला होता. मात्र अरिज खान हा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला पोलिसांनी 2018 मध्ये अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details