महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 25, 2021, 12:00 PM IST

ETV Bharat / bharat

टुलकिट प्रकरण : बीडच्या शंतनू मुळूकला दिलासा, ८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

टुलकिट प्रकरणातील संशयित आरोपी शंतनू मुळकच्या याचिकेवर दिल्लीतील पटियाला न्यायालयात आज (गुरुवार) सुनावणी झाली. न्यायालयाने शंतनू मुळूकला ८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

शंतनू मुळूक
शंतनू मुळूक

नवी दिल्ली - टुलकिट प्रकरणातील संशयित आरोपी शंतनू मुळकच्या याचिकेवर दिल्लीतील पटियाला न्यायालयात आज (गुरुवार) सुनावणी झाली. न्यायालयाने शंतनू मुळूकला ८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने याचिका दाखल केली होती. या प्रकरणात आता शंतनूला दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद खंडपीठाकडून मिळालेल्या अटकपूर्व जामीनाची मुदत उद्या (२६ फेब्रुवारी)ला संपत आहे. त्याआधी पुन्हा अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने अर्ज दाखल केला होता. त्यानुसार शंतनूला आता ८ मार्चपर्यंत दिलासा मिळाला आहे. शेतकरी आंदोनाबाबत टुलकिटद्वारे देशाची प्रतिमा मलिन होईल, अशी खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुळूकवर गुन्हा दाखल केला आहे.

शंतनू मुळूक, दिशा रवी यांची एकत्र चौकशी -

या प्रकरणी बंगळुरूतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तिला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने दिशा रवी आणि शंतनू मुळूक या दोघांची एकत्र चौकशी केली. दोघांनीही शेतकरी आंदोलनाच्या आधी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला हजेरी लावली होती. ही ऑनलाइन कॉन्फरन्स 'पोएटिक जस्टिस फाऊंडेशन' या संस्थेने आयोजित केली होती. या संघटनेचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा असून त्यांच्याशी दिशा रवी, आणि शंतनू मुळूक यांचे संबध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

दिशा रवीला जामीन मंजूर -

काल मंगळवारी दिल्लीतील न्यायालायने दिशा रवीला जामीन मंजूर केला. शेतकरी आंदोलासंबंधी टुलकिट प्रसारित केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. ३ फेब्रुवारीला स्वीडीश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गने हे टुलकिट शेअर केले होते. मात्र, हे ट्विट नंतर थुनबर्गने डिलीट केले होते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला तिने पाठिंबा दिला आहे. मुंबई येथील वकील निकिता जेकब यांच्यावरही पोलिसांनी टुलकिट पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details