नवी दिल्ली - कोरोना परिस्थिती बिकट असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 6 दिवसांपासून जारी टाळेबंदी पुढील आठवड्यात देखील कायम राहणार आहे. आता ही टाळेबंदी पुढील सोमवारी म्हणजेच 3 मे रोजी पहाटे 5 पर्यंत लागू असेल. लॉकडाऊन वाढविण्यात यावा, असे बहुतेक लोकांचे आणि जनतेचे मत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढील आठवड्यातही दिल्लीत टाळेबंदी; 3 मे पर्यंत मुदत वाढवली - दिल्ली लॉकडाऊन वाढवला
मागील 6 दिवसांपासून जारी टाळेबंदी पुढील आठवड्यात देखील कायम राहणार आहे. आता ही टाळेबंदी पुढील सोमवारी म्हणजेच 3 मे रोजी पहाटे 5 पर्यंत लागू असेल. लॉकडाऊन वाढविण्यात यावा, असे बहुतेक लोकांचे आणि जनतेचे मत आहे, असे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत टाळेबंदी
कोरोनाबाधितांची संख्या रोज वाढतच असून मृतांची संख्याही वाढली आहे. गेल्या आठवड्यात आम्ही 6 दिवसांसाठी टाळेबंदी लावली होती. त्याची मुदत उद्या 5 वाजता संपणार आहे. मात्र, कोरोना स्थितीमध्ये काहीही सुधारणा झालेली नाही, सध्याची वाढती कोरोना स्थिती पाहता टाळेबंदी वाढवणे आवश्यक होते. सध्याच्या परिस्थितीत टाळेबंदी वाढवावी, असेच अनेकांते आणि जनतेचेही मत आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज डिजिटल पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले.