नवी दिल्ली:Delhi cold wave: गुरुवारी दिल्लीकरांना हंगामातील सर्वात थंड अनुभवायला मिळाले. दिल्लीत तापमान 2.2 अंश सेल्सिअसपर्यंत temperature dropped in delhi घसरले. लोधी रोड, आयानगर आणि रिज येथील हवामान केंद्रांवर अनुक्रमे 2.8 अंश सेल्सिअस, 2.2 अंश सेल्सिअस आणि 2.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दाट धुक्याने शहर व्यापल्यामुळे दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी अलर्ट जारी केला आहे. coldest day of this season in delhi
भारतीय हवामान खात्याने India Meteorological Department जारी केलेल्या अहवालानुसार, गुरुवारी सकाळी 8.30 वाजता दिल्लीच्या सफदरजंग भागात किमान तापमान 3 अंश सेल्सिअस, पालम 6 अंश सेल्सिअस, लोधी रोड 2.8 अंश सेल्सिअस, रिज 2.8 अंश सेल्सिअस आणि 2.2 अंश सेल्सिअस होते. आया नगरमध्ये सेल्सिअसची नोंद झाली. दुसरीकडे, दिल्लीत आज कमाल तापमान 14 ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आणि आज सूर्योदय सकाळी 7.15 वाजता झाला तर सूर्यास्त संध्याकाळी 5.39 वाजता होईल.
राष्ट्रीय राजधानीत सकाळी 5.30 वाजता दाट धुके दिसले आणि पालम येथे किमान 25 मीटर आणि सफदरजंग येथे 50 मीटर दृश्यमानता होती, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले. राष्ट्रीय राजधानीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये राहिली असून PM 2.5 325 वर आणि PM 10 मध्यम श्रेणीमध्ये 195 वर आहे.0 आणि 50 मधील AQI 'चांगले', 51 आणि 100 'समाधानकारक', 101 आणि 200 'मध्यम', 201 आणि 300 'खराब', 301 आणि 400 'अतिशय खराब' आणि 401 आणि 500 'अतिशय गंभीर' मानले जातात. पुढील काही दिवस हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.