नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी नजरकैद केले असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. काल (सोमवार) केजरीवाल यांनी सिंघू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. यानंतर ते आपल्या निवासस्थानी परतले होते, जिथे त्यांना नजरकैद करण्यात आले आहे असे आपचे म्हणणे आहे.
दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर लावले बॅरिकेट्स..
केजरीवाल काल शेतकऱ्यांना भेटून आपल्या घरी परतले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या घराच्या सर्व बाजूंनी बॅरिकेट्स लावले आहेत. जेणेकरुन कोणीही आत जाऊ शकणार नाही, किंवा आतील व्यक्ती बाहेर येऊ शकणार नाही, असे आप नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.
आमदारांना पोलिसांनी केली मारहाण..