महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने सत्ता काढून घेण्याचे प्रयत्न सुरू; केजरीवालांची केंद्रावर टीका - अरविंद केजरीवाल लेटेस्ट न्यूज

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जींदच्या हुडा मैदानावर शेतकरी महापंचायतीला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला, त्यामुळे दिल्ली सरकारची शक्ती कमी करून आम्हाला शिक्षा देण्यात आली आहे, असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल
केजरीवाल

By

Published : Apr 4, 2021, 9:04 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जींदच्या हुडा मैदानावर शेतकरी महापंचायतीला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून केजरीवाल यांनी भाषणाला सुरवात केली. शेतकर्‍यांचे शहादत वाया जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले. आज संपूर्ण देशातील शेतकरी कृषी कायद्यावर नाराज आहे. आंदोलन करीत आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मी सर्व काही बलिदान करण्यास तयार आहे. आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला, त्यामुळे दिल्ली सरकारची शक्ती कमी करून आम्हाला शिक्षा देण्यात आली आहे, असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवालांची केंद्रावर टीका

केंद्र सरकारला शेतकऱ्यांना डांबण्यासाठी 9 मोठे तुरूंग बनवायचे होते. केंद्र सरकारने खूप दबाव आणला, पण मी दिल्लीत तुरुंग बनविण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. दिल्ली सरकारने सीमेवर मोफत वायफायची व्यवस्था केली. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना प्रोत्साहन दिले. तसेच शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला, म्हणून आमची सत्ता काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे केजरीवाल म्हणाले.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार प्रत्येक जणाला भाजपा देशद्रोही ठरवत आहे. मला भारताला जगातील पहिला क्रमांकाचा देश बनवायचा आहे. जोपर्यंत मी भारताला जगातील पहिला क्रमांकाचा देश बनवित नाही. तोपर्यंत मी मरणार नाही, असे केजीरवाल म्हणाले.

हेही वाचा -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : ममतांचे केंद्रीय दलांवरील आरोप चुकीचे; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details