महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

DELHI BUDGET 2022 : दिल्ली सरकार अर्थसंकल्प २०२२ : आरोग्य क्षेत्रासाठी ९ हजार ७६९ कोटींची भरघोस तरतूद - दिल्ली स्वास्थ्य क्षेत्र

दिल्ली सरकारने या वर्षाच्या अर्थसंकल्पाला ( Delhi Budget 2022 ) 'रोजगार बजेट' असे नाव दिले ( Rojgar Budget 2022 ) आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनीष सिसोदिया ( Deputy CM Manish Sisodia ) यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. सिसोदिया यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, तरुणांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे मुख्य लक्ष्य 20 लाख नोकऱ्या देण्याचे आहे. तसेच या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावरही भर दिला आहे.

दिल्ली सरकार अर्थसंकल्प २०२२ : आरोग्य क्षेत्रासाठी ९ हजार ७६९ कोटींची भरघोस तरतूद
दिल्ली सरकार अर्थसंकल्प २०२२ : आरोग्य क्षेत्रासाठी ९ हजार ७६९ कोटींची भरघोस तरतूद

By

Published : Mar 26, 2022, 3:00 PM IST

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आज आपला अर्थसंकल्प सादर ( Delhi Budget 2022 ) केला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Deputy CM Manish Sisodia ) यांनी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या. मनीष सिसोदिया यांनी आरोग्य क्षेत्रासाठी ९७६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला. यासोबतच सिसोदिया यांनी गेल्या वर्षी काय केले आणि पुढे काय केले जाणार याचा तपशीलही दिला आहे. सिसोदिया यांनी या बजेटमध्ये 'मोहल्ला क्लिनिक'वर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

सरकारी रुग्णालयांची १९०० कोटी : अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आरोग्य कार्ड योजना आणि 'मोहल्ला क्लिनिक'वर भर दिला. उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले की, 20 शाळांमध्ये 'मोहल्ला क्लिनिक'ही सुरू करण्यात आले आहेत. तसेच दिल्लीमधील सरकारी रुग्णालयांसाठी 1900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टोल फ्री हेल्पलाईन : त्याचबरोबर हेल्थ कार्ड योजना सुरू करण्यासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य कार्ड उपक्रमासाठी टोल फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दिल्लीतील लोकांना योग प्रशिक्षण देणाऱ्या योग शिक्षकांसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिल्ली आरोग्य कोष योजनेसाठी सरकारने 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details