नवी दिल्ली : दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता delhi bjp president adesh gupta यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत वीरेंद्र सचदेवा हे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ते दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष आहेत. adesh gupta resigned from his post
आदेश गुप्ता म्हणाले, "मी कालच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे माझा राजीनामा सुपूर्द केला होता. एमसीडी निवडणुकीतील पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही माझा राजीनामा स्वीकारला आहे. अध्यक्षपदाची निवड, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची दिल्ली भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.