नवी दिल्ली - दिल्ली सरकारने देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या पोलीस, सैन्यदल आणि नागरी सुरक्षा रक्षकांच्या ६ कुटुंबाकरिता प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. शूर अशा हुतात्म्यांचा गौरव करण्याकरिता व त्यांच्या कुटुंबांचे मनोधैर्य उंचाविण्याकरिता ही मदत जाहीर केल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ऑनलाईन परिषदेत सांगितले.
हौतात्म्य प्राप्त झालेल्यामध्ये भारतीय हवाई दलामधील तीन, दिल्ली पोलिसामधील दोन आणि नागरी सुरक्षेमधील एकाचा समावेश आहे. पत्रकार परिषदेमध्ये मनीष सिसोदिया यांनी हुतात्म्यांची नावे जाहीर केली आहेत.
हेही वाचा-पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ ५ दिवसांत मिल्खासिंग यांचे निधन, आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार
- दिल्ली पोलीस एसीपी संकेत कौशिक
एसीपी संकेत कौशिक हे वा वाहनांची तपासणी करताना त्यांना ट्रकने धडक दिली. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. कौशिक यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत.
- हवाई दलाचे अधिकारी राजेश कुमार-
राजेश कुमार यांचा अरुणाचल प्रदेशमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. ते दिल्लीमधील सफदरजंगमधील रहिवाशी होते. लग्नानंतर तीनच महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात घरात कोणीही कमविणारे नाही.
हेही वाचा-काका-पुतण्यासमोर काँग्रेस नेत्यांना किंमत नाही - पडळकर
- फ्लाईट लेफ्टनंट सुनीत मोहंती