महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Asian Wrestling Championship 2022 : 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत दीपक पुनियाने जिंकले कांस्यपदक

सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये, 23 वर्षीय पुनियाला अंतिम सुवर्णपदक विजेते उझबेकिस्तानच्या अझीझबेक फैझुलेव आणि किर्गिस्तानच्या नुरतिलेक करिपबाएव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, त्याने कझाकिस्तानच्या सत्याबेल्डीवर मात करत कांस्यपदक पटकावले (Deepak Punia Won Bronze Medal ).

DEEPAK PUNIA
DEEPAK PUNIA

By

Published : Jun 28, 2022, 1:07 PM IST

किर्गिझस्तान:टोकियो ऑलिंपियन दीपक पुनियाने किर्गिझस्तानमध्ये 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 ( Asian Under-23 Wrestling Championship 2022 ) मध्ये 86 किलो फ्रीस्टाइल वजन गटात मक्सत सत्याबेल्डीला पराभूत करून कांस्यपदक ( Deepak Punia won the bronze medal ) जिंकले. दीपकच्या बाजूने हा अप्रभावी निकाल होता, कारण भारतीय संघाला जागतिक चॅम्पियनशिपच्या रौप्यपदक विजेत्यापेक्षा या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.

सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये, 23 वर्षीय पुनियाला अंतिम सुवर्णपदक विजेते उझबेकिस्तानच्या अझीझबेक फैझुलेव ( Gold medalist Azizbek Faizulev ) आणि किर्गिस्तानच्या नुरतिलेक करिपबाएव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, olympics.com ने दिलेल्या वृत्तानुसार, त्याने कझाकिस्तानच्या सत्याबेल्डीला मागे टाकत कांस्यपदक जिंकले.

गेल्या महिन्यात, टोकियो 2020 पदक विजेते बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहिया यांच्यासह दीपक पुनियाचा ( Tokyo Olympian Deepak Punia ) 2022 च्या राष्ट्रकुल खेळासाठी भारतीय कुस्ती संघात समावेश करण्यात आला होता. भारताने या स्पर्धेत 23 वर्षांखालील स्पर्धेत 10 सुवर्ण पदकांसह एकूण 25 पदके जिंकली. आठ दिवसीय कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपचा रविवारी समारोप झाला.

हेही वाचा -ऑलिम्पिक हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details