रत्नागिरी -कोकण रेल्वे मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण ( Electrification of Konkan Railway completed ) झाले आहे. रोहा ते ठोकूर दरम्यानच्या ७४१ किलोमीटर लांबीच्या विद्युतीकरण झालेल्या कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे लोकार्पन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ( Dedication of Konkan Railway by Narendra Modi ) दूरदृष्यप्रणालीद्वारे आज झाले. कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासह अन्य पाच रेल्वे प्रकल्पाचे तसेच पाच राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्पांचे ( Dedication Ceremony of Five National Highway Projects ) मोदी यांनी बेंगळूर येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे केले. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री उपस्थित ( Chief Minister of Karnataka and other ministers present ) होते. पंतप्रधान मोदी यांनी रिमोट कंट्रोलद्वारे विद्युतीकरणाच्या फलकाचे अनावरण केले.
हिरवा झेंडाही दाखवला -त्यांनी विजेवर चालणार्या गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवला. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील सहा स्थानकांवरुन विजेवरील इंजिन जोडलेल्या मालवाहतूक गाड्यांचा प्रवास सुरु झाला. रत्नागिरी स्थानकावरुन विद्युत इंजिन जोडलेली मालगाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. या कार्यक्रमाची औपचारीकता रत्नागिरीत करण्यात आली. कोकण रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावरील पहिल्या फलाटावर मंडप टाकून मोठी स्क्रिन उभी केली होती.