महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rudraprayag Landslide: रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन.. अन् क्षणार्धात कोसळला मातीचा ढिगारा, हायवे झाला बंद - भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग १०९ बंद

Rudraprayag Landslide: अचानक भूस्खलन झाल्यामुळे रुद्रप्रयाग येथील राष्ट्रीय महामार्ग (NH)- 109 गुरुवारी बंद करण्यात आला. दरम्यान, भूस्खलन होत असतानाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

Rudraprayag Landslide
रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन

By

Published : Sep 22, 2022, 1:16 PM IST

रुद्रप्रयाग (उत्तराखंड): Rudraprayag Landslide: तरसाली गावाजवळील डोंगरावरून मातीचा ढिगारा खाली कोसळल्याने अचानक भूस्खलन झाल्यामुळे रुद्रप्रयाग येथील राष्ट्रीय महामार्ग (NH)- 109 गुरुवारी बंद करण्यात आला. दरम्यान, भूस्खलन होत असतानाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

रुद्रप्रयागमध्ये भूस्खलनामुळे अडथळा निर्माण झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ढिगारा पडण्यापूर्वी स्थानिक लोकांनी प्रवाशांना परत पाठवल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जिल्हा दंडाधिकारी (डीएम) मयूर दीक्षित यांनी एएनआयला सांगितले की महामार्ग उघडण्याचे काम सुरू झाले आहे आणि प्रवाशांची सुरक्षित हालचाल केली जाईल."सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे.

महामार्ग उघडण्याचे काम राष्ट्रीय महामार्गांकडून केले जात आहे. एकदा का ढिगारा हटवला की प्रवाशांची सुरक्षित वाहने चालवली जातील," असे डीएम दीक्षित म्हणाले.केदारनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना रुद्रप्रयाग , तिलवाडा, अगस्त्यमुनी आणि गुप्तकाशी येथे थांबवण्यात आले. सोनप्रयागहून परत येणाऱ्या यात्रेकरूंना सोनप्रयाग, सीतापूर इत्यादी ठिकाणी सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details