बेंगळुरू (कर्नाटक) : अभिनेत्री संजना गलराणी बेंगळुरूच्या इंदिरानगरमध्ये राहते. पार्किंगच्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता, शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन अपमान केल्याचा आरोप तीने केला आहे. (दि. 12 सप्टेंबर 2022)रोजी सायंकाळी घडलेल्या घटनेबाबत न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर तीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आता पोलिसही सक्रिय झाले असून या प्रकरणात नक्की काय झाले होते याबद्दल ते तपास करत आहेत.
आम्हाला हवी तशी गाडी लावू, कोणी विचारले तर मारून टाकू : यशोधम्मा आणि राजन्ना यांचे घर संजना गलराणी यांच्या घराशेजारी आहे. सुमारे सहा वाहने असलेल्या राजण्णा यांनी सार्वजनिक रस्त्यावर आपल्या गाड्या पार्क केल्या होत्या. संजना गालराणी यांनी राजण्णा यांना सांगितले की, अशा प्रकारे कार पार्क केल्याने शेजारील लोकांना ये-जा करण्यात अडचण येत आहे. त्याला उत्तर देताना राजण्णा यांनी 'आम्ही चाळीस वर्षांपासून येथे राहतो, आम्हाला हवी तशी गाडी लावू, कोणी विचारले तर मारून टाकू', असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे संदनाने म्हटले आहे.