संताजी जगनाडे महाराज :संताजी जगनाडे महाराज ( Shri Santaji Jaganade Maharaj ) यांनी संत तुकारामांनी गायलेल्या ( Abhang of Jagadguru Tukobaraya ) अभंगांचे लेखन केले. संताजी हे जातीने तेली होते. त्यांना 'संतु तेली' म्हणूनही ओळखले जात असे. श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चाकण गावात झाला. त्यांचा जन्म जगनाडे कुटुंबात श्री विठोबा पंत आणि मथुबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या घरातील वातावरण अध्यात्मिक आणि धार्मिक होते. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवून लिहून काढलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवून लिहून काढलेत. ( Death anniversary of sant Santaji Jaganade )
पुण्यतिथीनिमित्त नितीन गडकरी यांनी केले ट्विट : नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे मानवतेची शिकवण देणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ( Greetings on death anniversary ) केले. संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ला झाला असं मानले जाते. ९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचे तिकीटही निघाले. यात त्यांचा कार्यकाळ १६२४ ते १६८८ असा सांगितला आहे. शासकीय मतानुसार संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन ठरतात. काही मतप्रवाहानुसार त्यांचा कार्यकाळ १६५० ते १६०८ असाही सांगितला जातो. मात्र वारकरी संताजी महाराजांना संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक मानतात. डॉ. किशोर सानप यांच्या ‘समग्र तुकाराम दर्शन’ या ग्रंथात संत चरित्रकार महिपतीबोवांनी संत तुकोबारायांच्या १४ टाळकऱ्यांचा उल्लेख केल्याचे नमूद आहे.