नवी दिल्लीदेशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची 16 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे जिंदादिल राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती विशिष्ट पद्धतीची भाषणशैली आणि कवितांमुळेही ते प्रख्यात होते ते संयमी राजकारणी होते त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणुन घेऊया त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी
अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते निष्णात राजकारणी निस्पृह सामाजिक कार्यकर्ते बलवान वक्ते कवी साहित्यिक पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात वाजपेयी यांनी भारत पाकिस्तान या देशामधील संबंध सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले 1996 मध्ये वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले मात्र त्यांचे सरकार त्यावेळी 13 दिवसच टिकले तर पुन्हा 1998 मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळीही त्यांचे सरकार 13 महिनेच होते 1999 मध्ये वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले यावेळी त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला
16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले होते वाजपेयी यांनी 3 वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषविले आहे वाजपेयी यांचा जयंती दिन 25 डिसेंबर हा दिवस गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो वाजपेयी यांना 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेला पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्रात हिंदीत भाषण करणारे ते पहिले परराष्ट्र मंत्री होते 2012 मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियनया आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वाजपेयी नवव्या क्रमांकावर होते राजकारणात यशस्वी झाले पण त्यांनी लग्न केले नव्हते पण त्यांचे राजकुमारी कौल यांच्यावर प्रेम होते असे सांगितले जाते अटल बिहारी वाजपेयींना अपत्य नाही मात्र त्यांनी नमिता कौल हिला दत्तक मुलगी मानले तिला सांभाळले नमिता कौल यांचे लग्न रंजन भट्टाचार्य यांच्याशी झाले आहे
मे 1998 मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली 5 अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले तरी अमेरिका कॅनडा जपान इंग्लंड युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही