महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अजब कारभार; फिरोजाबादमध्ये मृत महिलेला दिला कोरोनाचा बुस्टर डोस - अनार देवी यांच्या मुलाला बुस्टर डोस दिल्याचा मेसेज

फिरोजाबादमध्ये बुस्टर डोसचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. मृत महिलेला बुस्टर डोस दिल्याची बाब रेकॉर्डमध्ये समोर आली आहे. मार्च महिन्यातच या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेच्या मुलाच्या मोबाईलवर बूस्टर डोस दिल्याचा मेसेज आल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

फिरोजाबादमध्ये मृत महिलेला दिला कोरोनाचा बुस्टर डोस
फिरोजाबादमध्ये मृत महिलेला दिला कोरोनाचा बुस्टर डोस

By

Published : Aug 9, 2022, 2:21 PM IST

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) :यूपीच्या फिरोजाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरणात फसवणूक झाल्याच्या तक्रारींनंतर आता बूस्टर डोस मिळवण्यातही फसवणूक समोर आली आहे. प्रत्यक्षात, परिसरातील एका वृद्ध महिलेला 7 ऑगस्ट रोजी नोंदीनुसार बुस्टर डोस देण्यात आला होता. जिचा मार्चमध्ये मृत्यू झाला होता. सध्या सीएमओने या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे. अशीच आणखी काही प्रकरणे उजेडात आल्याची चर्चा आहे. जिथे लसीकरण न करता लोकांच्या फोनवर मेसेज आले आहेत.

फिरोजाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथे सक्रिय प्रकरणांची संख्या पुन्हा 58 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत या आजारापासून लोकांना वाचवण्यासाठी बुस्टर डोस देण्याची मोहीम सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

रविवारी फिरोजाबाद जिल्ह्यात ३२१ ठिकाणी शिबिरे उभारून २७ हजार लोकांना बुस्टर डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील 27,200 लोकांना बूस्टर डोसही मिळाला आहे. यामध्ये 17 मार्च 2022 रोजी मरण पावलेल्या महिलेला देखील एक संदेश आला होता.

मयत अनार देवी यांच्या मुलाला बुस्टर डोस दिल्याचा मेसेज आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला. कारण 7 ऑगस्टला मेसेज आला होता आणि 17 मार्चलाच महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत महिलेच्या कुटुंबीयांनी आरोग्य केंद्रात तक्रार केली आहे. यासंदर्भात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेशकुमार प्रेमी यांनी सांगितले की हा निष्काळजीपणा कोणत्या स्तरावर घडला आहे. त्याची चौकशी केली जाईल.

हेही वाचा - Coronavirus New Cases Today : देशात 24 तासात 15,528 कोरोना रुग्णांची नोंद, तर 25 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details