नवी दिल्ली - चित्रपटांमध्ये मृत झालेली व्यक्ती अखेरच्या क्षणाला उठून बसते, हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण असा प्रसंग खऱ्या आयुष्यात घडला तर? विश्वास नाही बसणार पण असा प्रकार मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये खरच घडला आहे. चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागला. यामुळे स्मशानभूमीत एकच गोंधळ उडला.
‘मृत’ व्यक्ती जिवंत होते. अशोक नगरमधील अनिल जैन नावाच्या तरुणावर जिल्हा हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यावर अंतिम संस्कारासाठी त्याला स्मशानभूमीत नेण्यात आले. देहाला चीतेवर टाकल्यानंतर शरीरात हालचाल झाली आणि अचानक तो उठून बसला. हे पाहून स्मशानभूमीत एकच गोंधळ उडला.
कुटुंबीयांनी ताबडतोप डॉक्टर आणि रुग्णवाहिका बोलावली. मात्र, डॉक्टारांनी त्याला मृत घोषीत केले. मात्र, कुटुंबीयांना मानन्यास नकार दिल्यानंतर अनिलला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून अनिलला मृत घोषीत केले.
रुग्णालयांचा बेजबाबदारपणा -
नातेवाईकांनी रुग्णालयावर बेजबाबदारपणाचा आरोप लावला. मात्र, रुग्णालयाने हे आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयात आणण्यापूर्वीच ती व्यक्ती मृत होता असे रुग्णालयाने म्हटलं आहे. कोरोनाच्या या संकटात रुग्णालयाच्या बेजाबदारपणामुळे अनेक विचित्र घटना घडल्या आहेत. मात्र, गलथान कारभारामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी -
कोरोनाची दुसरी लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. आज भारतात कोरोनाच्या 2,57,299 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,62,89,290 एवढी आहे. देशात गेल्या २४ तासांत 4,194 नवीन मृत्यू झाले असून, आतापर्यंत मृतांची संख्या 2,95,525 वर गेली आहे. 3,57,630 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 2,30,70,365 नागरिकांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 29,23,400 आहे.
हेही वाचा -'ब्लॅक फंगसचा सामना करण्यासाठी टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील'