पणजी ( गोवा ) -पणजी येथील मांडवी हॉटेलजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनामध्ये एका पर्यटक व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
पणजी शहराच्या मध्यवर्ती व अतिशय गजबजेल्या भागात असणाऱ्या मांडवी हॉटेल परिसरात चारचाकी ( के ए 25 एस डी 9404 ) काही दिवसांपासून उभी होती. बुधवारी (दि. 1 जून) दुपारच्या सुमारास या गाडीच्या सभोवताली दुर्गंधी पसरली होती. तेव्हा स्थानिकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर पोलिसांनी गाडीचा ताबा घेऊन गाडी उघडली असता कुजलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.
कारमध्ये आढळला पर्यटकांचा मृतदेह - चारचाकी वाहन
पणजी येथील मांडवी हॉटेलजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनामध्ये एका पर्यटक व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
वाहन