दूदू (जयपुर )- जयपूर जिल्हा ग्रामीणच्या दुडू पोलीस स्टेशन परिसरात 3 सख्ख्या बहिणींसह 2 मुलांचे मृतदेह सापडले ( Dudu Sisters dies by Suicide ) आहेत. विहिरीतून 3 महिला आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हुंड्यामुळे या तिघींनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
25 मे रोजी दुपारी दोन मुलांना घेऊन बहिणी घराबाहेर पडल्या ( Dead Bodies Of 3 Sisters ) होत्या. कालू देवी, ममता देवी आणि कमलेश या 3 सख्ख्या बहिणींचे मृतदेह व 4 वर्षीय हर्षित आणि 26 दिवसांच्या नवजात अर्भकातचे मृतदेह नरेणा रोडजवळील विहिरीत ( 5 Bodies At Dudu Recovered ) सापडले. माहिती मिळताच दुडू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
सासरी होणाऱ्या मारहाणीमुळे तिघींचा छळ -दोन मुलांसह तीन महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ममता देवी 8 महिन्यांची आणि कमलेश ही 9 महिन्यांची गरोदर होती. सासरी होणाऱ्या मारहाणीमुळे तिघींचा छळ होत असल्याचा आरोप होत आहे. त्या बराच वेळ तणावाखाली होते, असा आरोप आहे. अशा परिस्थितीत सासरच्या छळाला कंटाळून तिघींनी दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सासरच्यांनी खूप छळ केला - मृताचे नातेवाईक हेमराज मीना यांनी सांगितले की, तिन्ही सख्ख्या बहिणींचे एकाच घरात लग्न झाले होते. सासू, नणंद आणि तिन्ही महिलांचे पती हे सासरच्या घरात खूप त्रास देत असे. तिन्ही सख्ख्या बहिणींना त्यांचे मारहाण करायचे. 10 दिवसांपूर्वी सासरच्या मंडळींनी मारहाण आणि छळ करून तिन्ही बहिणींना घरातून हाकलून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिन्ही सख्ख्या बहिणींना त्यांच्या माहेरी आणण्यात आले. मारहाणीमुळे कालू देवी यांच्या डोक्याला आणि डोळ्यालाही जखमा झाल्या होत्या. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिन्ही सख्ख्या बहिणींच्या कुटुंबीयांनी अनेकवेळा सासरच्या मंडळींशी चर्चा केली. मात्र त्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. दबावामुळे अखेर तिघांनीही सामूहिक आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची भीती व्यक्त होत आहे. आता मृतांचे नातेवाईक सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करणार आहेत.