महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Corbevax Vaccine : देशाला मिळणार आणखी स्वदेशी कोरोना लस; बायॉलिजिकल कंपनीच्या कॉर्बव्हॅक्सला केंद्राकडून मंजुरी - देशाची दुसरी स्वदेशी लस

बायोलॉजीकल- ईच्या प्रस्तावाचे ( Biological Es for children ) परीक्षण कोव्हिड-१९ वरील नॅशनल एक्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशनकडून करण्यात आले. त्यांनतर या तज्ज्ञांच्या समितीने लशीची केंद्र सरकारला शिफारस करण्यात आलेली ( DCGI approve Corbevax vaccine ) आहे. देशाला दुसरी स्वदेशी कोरोना लस मिळणार आहे.

DCGI grants final approval to Biological Es COVID19 vaccine Corbevax
देशाला मिळणार आणखी स्वदेशी कोरोना लस

By

Published : Feb 21, 2022, 6:53 PM IST

Updated : Feb 21, 2022, 7:40 PM IST

नवी दिल्ली- भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिननंतर देशाला आणखी एक स्वदेशी कोरोना लस मिळणार आहे. देशाच्या औषध महानियंत्रकांनी बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनीच्या कॉर्बव्हॅक्स या कोरोना लशीला मंजुरी दिली ( Biological E Limiteds Corbevax vaccine ) आहे. ही लस 12 ते 18 18 वर्षे वयोगटातील मुलांवर केवळ आपत्कालीन स्थितीत वापरता येणार आहे.


बायोलॉजीकल- ईच्या प्रस्तावाचे ( Biological Es for children ) परीक्षण कोव्हिड-१९ वरील नॅशनल एक्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशनकडून करण्यात आले. त्यांनतर या तज्ज्ञांच्या समितीने लशीची केंद्र सरकारला शिफारस करण्यात आलेली ( DCGI approve Corbevax vaccine ) आहे. देशाला दुसरी स्वदेशी कोरोना लस मिळणार आहे.

हेही वाचा-Lalu Prasad Yadav : जामीन मिळाल्यानंतर लालूंची हत्तीवरुन मिरवणूक, न्यायाधीश म्हणाले...

केंद्र सरकारकडून स्वदेशी लसनिर्मितीला प्रोत्साहन-

केंद्र सरकारकडून स्वदेशी लशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून बायोलिजिकल-ईला संशोधन, विकास यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने केवळ १०० कोटींची आर्थिक मदत नव्हे तर भागीदार म्हणूनही बायोलॉजिकल-ई कंपनीला संशोधनासाठी मदत करणार आहे. केंद्र सरकारने कोव्हिड-१९ लस विकास मोहिम आणि मिशन कोव्हिड सुरक्षेंतर्गत कोरोना लस निर्मितीला चालना दिली आहे. तसेच यापूर्वी आत्मनिर्भर भारत योजनेलाही प्रोत्साहन दिले आहे.

हेही वाचा-MLA Keshav Chandra Dance : आमदाराचा नागिन डान्स पाहिलात का?

बायॉलिजीकल-ई ठरणार दुसरी स्वदेशी कोरोना लस

कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेकने विकसित केलेली पहिली स्वदेशी कोरोना लस आहे. बायॉलिजीकल-ई या कंपनीच्या लशीच्या सर्व वैद्यकीय चाचण्या यशस्वी ठरल्या तर ही देशातील दुसरी स्वदेशी कोरोना लस ठरणार आहे.

हेही वाचा-Lalu Yadav Fodder Scam : 139 कोटींच्या चारा घोटाळाप्रकरणी लालूंना ५ वर्षांची शिक्षा

Last Updated : Feb 21, 2022, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details