नवी दिल्ली - ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याची धास्ती असताना दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटकची कोव्हॅक्सिन ही कोरोना लस १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना देण्याकरिता डीसीजीआयने मान्यता ( DCGI approves Covaxin for children ) दिली आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
सुत्राच्या माहितीनुसार १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन देण्याकरिता डीसीजीआयने भारत बायोटकेला ( 12 to 18 years vaccination in India ) परवानगी दिली आहे. ही केवळ आपत्कालीन बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वीच भारत बायोटेकने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील कोव्हिक्सिन चाचण्यांची आकडेवारी केंद्रीय औषध गुणवत्ता नियंत्रण संस्थेला ( CDSCO approval to Bharat biotech ) दिली आहे. या आकडेवारीचे सीडीएसीओने पुनरावलोकन केले आहे. तर विषय तज्ज्ञांच्या समितीने ( Subject Experts Committee ) लस देण्याकरिता सकारात्मक शिफारशी केल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
हेही वाचा-Omicron in Mumbai : मुंबई पालिका कोरोना आणि ओमायक्रॉनला रोखण्यासाठी सज्ज!