नवी दिल्ली -कोरोनाच्या लढ्यात आणखी बळ मिळणार आहे. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी औषध तयार केले आहे. या औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मंजुरी दिली आहे. न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेसच्या (आयएनएमएस-डीआरडीओ) शास्त्रज्ञांनी 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) या औषधाबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा-विशेष : कोरोना लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर ३५ हजार कोटी निधीपैकी खूपच कमी खर्च
औषध कोरोनावर विषाणुवर प्रभावी
डॉ. सुधीर चांदना म्हणाले, की आम्ही एप्रिल २०२० मध्ये कोविड औषध निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण काम सुरू केले होते. आम्ही सीसीएमबी हैदराबादमध्ये पहिला प्रयोग केला होता. त्यावेळी डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) या औषधाचा विषाणुवर होणाऱ्या परिणामाबाबत माहिती मिळाली. हे औषध कोरोनावर विषाणुवर प्रभावी असल्याचे दिसून आले.
हेही वाचा-सीमा शुल्क प्रक्रियेत दोन दिवस अडकले ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर; निधी गोळा करून केली होती आयात
आम्ही ड्रग कंट्रोलरकडून वैद्यकीय चाचण्यांची परवानगी मागितली होती. मे २०२० मध्ये औषधाची वैद्यकीय चाचणी सुरू केली होती. दुसरा टप्पा ऑक्टोबर २०२० पर्यंत सुरू होता. त्यावेळी औषध हे कोरोनावर प्रभावी असल्याचे आढळले. कोरोनाबाधितांना औषध दिल्यास त्यांना फायदा होत असल्याचेही दिसून आले.
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी डीजीसीआयने दिली होती परवानगी-
शास्त्रज्ञ डॉ. अनंत नारायण म्हणाले, की डीसीजीने आम्हाला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली होती. त्यावेळी आम्ही तयार केलेले औषध कोरोनाबाधितांवर परिणामकारक असल्याचे आढळले आहे. कोरोनाच्या विषाणूने बदललेल्या व्हेरियंटवरही प्रभावी आहे.
डीजीसीआयने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औषधाचा आप्तकालीन परिस्थिती वापर करण्याची परवानगी दिली आहे. हे औषध लवकरात लवकर बाजारपेठेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर हे औषध रुग्णापर्यंत पोहोचू शकेल, असे शास्त्रज्ञ डॉ. अनंत नारायण यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे इशारा-
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन सेवा प्रमुख डॉ. मायकल रेयान म्हणाले की, कोरोनाचा व्हायरस वेगाने एका देशातून दुसऱ्या देशात पसरत आहे. आणि देशातील पुढारी हा विचार करत असतील की लसीकरण केल्याने ही महामारी संपेल, तर ते चूक करत आहेत. ही महामारी विषाणूच्या वेगवेगळ्या बदलत्या स्वरूपानुसार आणि मानवी व्यवहारानुसार बदलत असल्याची माहिती रेयान यांनी सांगितले.