बहारिच -देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागत आहे. यादरम्यान, एका महिलेला इमरजन्सीमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने त्या रुग्णाच्या मुलींनी तोंडातून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला.
मुलींनी आईला मृत्यूच्या खाईतून बाहेर काढलं -
एका महिलेला शनिवारी श्वास घ्यायला जास्त त्रास व्हायला लागला. तेव्हा त्याच्या नातेवाईंनी त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात आणलं. पण रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा होता. त्यामुळे त्या महिलेला ऑक्सिजन मिळाले नाही. तेव्हा त्या महिलेच्या मुलींनी त्या महिलेला तोंडातून ऑक्सिजन दिला. हे दृश्य पाहून रुग्णालय परिसरात खळबळ उडाली.