महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Daughter Kills Mother : मुलीने आईचा गळा दाबून केला खून; मृतदेह सूटकेसमध्ये भरुन गाठले पोलीस ठाणे, पोलीस चक्रावले - आईचे आणि सासूचे रोज भांडणे

आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उच्च शिक्षित मुलीने आपल्या आईचा गळा दाबून खून केल्यानंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरुन थेट पोलीस ठाणे गाठले. या वेळी पोलीस ठाण्यातील पोलीसही चक्रावून गेले.

Daughter Kills Mother
आईचा खून केल्यानंतर सूटकेसमध्ये भरलेला मृतदेह

By

Published : Jun 13, 2023, 1:25 PM IST

बंगळुरू :आईचे आणि सासूचे रोज भांडणे होत असल्याच्या रागातून मुलीने आईचा गळा दाबून खून करत मृतदेह सूटकेसमध्ये भरुन पोलीस ठाणे गाठले. ही धक्कादायक घटना बंगळुरुमधील मायको लेआऊट पोलीस ठाण्याच्या परिसरात सोमवारी रात्री घडली. सेनाली सेन असे आईचा खून करणाऱ्या मुलीचे नाव आहे. तर बीवा पॉल असे खून झालेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. सेनाली ही उच्च शिक्षित असून तिने मास्टर ऑफ फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले आहे.

आई आणि सासूचे रोज सुरू होते भांडण :सेनाली मूळची कोलकाता येथील आहे. सेनालीने मास्टर ऑफ फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगा आहे. मायको लेआऊटमधील एका खासगी अपार्टमेंटमध्ये सेनाली तिच्या कुटुंबासह सहा वर्षांपासून राहत आहे. मात्र तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर आईची जबाबदारीही सेनालीवर येऊन पडली. त्यामुळे सेनालीने आईला पतीच्या घरी आणले होते. मात्र त्याच घरात राहणाऱ्या सेनालीची आई आणि सासू यांच्यात रोज भांडण होत असे. या भांडणाला सेनाली खूप कंटाळली होती.

आईला खाऊ घालायची झोपेच्या गोळ्या :सेनालीच्या आईचे आणि सासूचे रोज भांडण होत होते. त्यामुळे सेनाली तिच्या आईला झोपेच्या गोळ्या खाऊ घालायची. सोमवारीही सेनालीने तिच्या आईला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या होत्या. मात्र रात्री अकराच्या सुमारास आईला पोटात दुखू लागले. त्यानंतर सेनालीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तिने तिच्या आईचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि सोबत वडिलांचा फोटो ठेवला.

सूटकेसमध्ये मृतदेह भरुन गाठले पोलीस ठाणे :सेनालीने आई बीवा पॉल यांचा गळा आवळून खून केल्यानंतर तिने आईचा मृतदेह भल्या मोठ्या सूटकेसमध्ये भरला. त्या सूटकेसवर तिच्या वडिलांचा फोटो लावला. त्यानंतर सेनालीने थेट कॅब बूक करुन मायको लेआउट पोलीस ठाणे गाठले. यावेळी तिने आपण आईचा खून केल्याची माहिती पोलिसांना देऊन सूटकेसमध्ये मृतदेह असल्याचे सांगितले. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीसही हादरुन गेले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा -

  1. Thane Crime : ठाण्यात एका गुंडाने दुसऱ्या गुंडाला चाकूने भोसकले; भर रस्त्यात खून झाल्याने दहशत
  2. Mira Murder case : मनोज साने डेटिंग अ‌ॅपवर होता ऍक्टिव्ह, गुगलवर सर्च करत होता 'ही' गोष्ट; सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details