नवी दिल्ली - सज्ञान मुलगी जर पित्यासोबत नातेसंबंध ठेवत नसेल तर तिला पैसे मागण्याचा अधिकार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. याच खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पतीला एकरकमी 10 लाख रुपये आणि हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
घटस्फोटाच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जोडप्याच्या 20 वर्षांच्या मुलीच्या लग्न आणि शिक्षणावरील खर्चाबाबतची भूमिकाही स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, मुलीला तिच्या वडिलांसोबत नातेसंबंध ठेवायचा आहे की नाही याचा अधिकार आहे. परंतु जर तिचे तिच्या वडिलांशी कोणतेही नाते नसेल, तर तिला त्यांच्याकडून शिक्षणासाठी खर्चाची मागणी करण्याचा अधिकार नाही (मुलगी शिक्षणासाठी पैशाची मागणी करू शकत नाही). पित्याला स्वेच्छेने आपल्या मुलीला मेंटेनन्स द्यायचा ( court grants divorce to couple ) असेल तर ते देऊ शकतात.
पतीला 10 लाख रुपये जमा करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल ( Supreme court on divorce case ) आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर घटस्फोटाशी संबंधित एका खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यामध्ये न्यायालयाने कोणताही तोडगा न काढता या जोडप्याला घटस्फोट मंजूर (daughter cannot demand money for edu) केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पत्नीसाठी पतीला दरमहा 8,000 रुपये आणि दाव्यांच्या पूर्ण आणि अंतिम निकालासाठी 10 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.