बंगळुरू -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी दत्ताजी होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता भैय्याजी जोशी यांची जागा दत्तात्रेय होसाबाळे घेतील. 2009 पासून सरकार्यवाह पदाची धुरा सांभाळणारे भैय्याजी जोशी हेच या पदावर कायम राहणार अशी शक्यता होती. मात्र तब्बल 12 वर्षांनी या पदावर दत्तात्रय होसबळे यांची निवड झाली आहे. तर भैयाजी जोशी यांच्याकडे नवी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. तर दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. प्रथमच ही सभा कोरोनामुळे संघ मुख्यालयी म्हणजे नागपुरात न होता बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे. सरकार्यवाहचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे.
कोण आहेत दत्तात्रय होसबळे?
- दत्तात्रेय होसबळे यांना आरएसएसमध्ये दत्ताजी या नावाने लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1954 रोजी कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील सोराबा तालुक्यातील होसाबाळ या छोट्याशा गावात झाला आहे.
- होसबळे यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंधित आहेत. दत्तात्रय होसबळे हे विद्यार्थी दशेपासून संघाच्या विविध उपक्रमात सहभागी होत असायचे. 1978 साली त्यांनी बंगलोर विश्व विद्यालयातून इंग्रजी भाषेत एम ए केलेलं आहे. त्याचा संघातील प्रावस हा 41 वर्षांचा झालेला आहे.
- 1978 पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकीय जीवनास सुरुवात केली. ते दोन दशके एबीव्हीपीचे संघटन महामंत्री होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी संघात सह सरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
- दत्तात्रय होसबळे हे 65 वर्षीय आहेत.
- दत्तात्रय होसबळे हे मूळ कर्नाटकमधील असून मातृभाषा कन्नड आहे.
- संस्कृतसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
- दत्तात्रय होसबळे हे इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत
- कन्नड भाषेतील असिमा नावाच्या मासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत.
- त्यांनी एकदा तुरुंगवासही भोगला आहे. मिसा कायद्या अंतर्गत जेलमध्ये होते.