नवी दिल्ली - एका महिला फॅशन इन्फ्लुएंसरचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे. ज्यामध्ये ती लठ्ठ शरीर असूनही पूर्ण आत्मविश्वासाने तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह्स दाखवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ही महिला, एका समुद्रकिनाऱ्यावर, बोल्ड डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ इन्स्टावर प्रचंड व्हायरल झाला, ज्याला नेटकऱ्यांनीही (Instagram) पसंती दिली आहे. अनेकांनी तिचे कौतुक देखील केले आहे.
बोल्ड डान्स मूव्ह तुफान व्हायरल : (Deepika Padukone) दीपिका-शाहरुख खानच्या मोस्ट अवेटेड ‘पठाण’ चित्रपटातील दोन गाणी आतापर्यंत रिलीज झाली आहेत. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने (Besharam Rang Song) सध्या खळबळ माजवली आहे. एकीकडे या गाण्यावरील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत, तर दुसरीकडे हे गाणे आजकाल हजारो कंटेंट क्रिएटर्सची पहिली पसंती ठरत आहे. या गाण्यावर देश-विदेशातील लोक त्यांच्या डान्सचे व्हिडीओ रिल बनवताना दिसत आहेत. आता एका फॅशन इन्फ्लुएंसने या गाण्यावर तिच्या बोल्ड डान्स मूव्ह दाखवल्या आहेत.
दीपिकाच्या प्रत्येक डान्स स्टेपची उत्कृष्ट कॉपी :तन्वी गीता रविशंकर (Tanvi Geeta Ravi Shankar) नावाच्या या फॅशन इन्फ्लुएंसरने (Fashion Influencer) 'बेशरम रंग' या गाण्यातून दीपिका पादुकोणच्या प्रत्येक डान्स स्टेपची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे, जे इंटरनेट युजर्सच्या पसंतीस उतरत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, या महिलेने लिहिले आहे की, 'बेशरम व्हा, तुम्हाला जे आवडते ते करा, तुम्हाला जे आवडते ते परिधान करा आणि तुम्हाला हवे ते जीवन जगा'. यामुळे तुम्ही एखाद्याच्या नजरेत 'बेशरम' बनाल, तरी त्याचा काहीही फरक पडत नाही. आपण 2023 मध्ये प्रवेश करत आहोत, त्यामुळे चिंता सोडा आणि मनाप्रमाणे वागा, जगा...
मनसोक्त जगण्याची वृत्ती : एकीकडे अनेकांनी बिकनी आणि भगवे कपडे यावरुन दीपिकाला आणि या गाण्याला प्रचंड ट्रोल केले आहे. तर, दुसरीकडे जग काय म्हणतं हा विचार झुगारुन मनसोक्त जगण्याचा सल्ला या फॅशन इन्फ्लुएंसरने दिला आहे. आणि विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी देखील तिच्या या ॲटीट्युडला पसंती दिली आहे. यामुळे आता दीपिका आणि शारुखचा 'पठाण' बॉक्स ऑफीसवर केवळ चालणारच नाही तर, 2023 या नविन वर्षात चक्क धावणार, असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही.