महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दुर्गापूर धरणाच्या बॅरेजची लवकरच दुरुस्ती होईल पूर्ण, अधिकाऱ्यांना विश्वास

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर धरणाच्या लॉक गेटचा काही भाग खराब झाल्याने पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील सखल भागात पूरस्थितीच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याविषयी बोलताना 'बऱ्याच प्रमाणात परिस्थिती ठीक आहे. मात्र, काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जर काम आज सायंकाळपर्यंत सुरू झाले तर, उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे,' असे पश्चिम वर्धमानचे जिल्हा दंडाधिकारी पूर्णेन्दू माजी यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल दुर्गापूर धरण
पश्चिम बंगाल दुर्गापूर धरण

By

Published : Nov 3, 2020, 7:59 PM IST

दुर्गापूर (पश्चिम बंगाल) -राज्य सरकारकडून दुर्गापूर बॅरेजचे खराब झालेले लॉक गेट बुधवारपर्यंत दुरुस्त करण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी तुटलेले फाटक खेचण्यासाठी क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, खराब झालेल्या लॉक गेटजवळील नदीकाठचा भाग सुकविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

पश्चिम बंगाल दुर्गापूर धरण

'बऱ्याच प्रमाणात परिस्थिती ठीक आहे. मात्र, काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जर काम आज सायंकाळपर्यंत सुरू झाले तर, उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे,' असे पश्चिम वर्धमानचे जिल्हा दंडाधिकारी पूर्णेन्दू माजी यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल दुर्गापूर धरण

सिंचन विभागाचे कर्मचारी पर्यायी पद्धतींचा विचार करत आहेत. कारण खराब झालेल्या लॉक गेटजवळील नदीकाठचे क्षेत्र दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी पूर्णपणे सुकलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा -चक्क पेनापासून उगवणार झाड!... वाचा नेमके प्रकरण काय

दरम्यान, औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याच्या टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

दुर्गापूर महानगरपालिकेचे महापौर (डीएमसी) दिलीपकुमार आगास्टी म्हणाले की, दुर्गापूर स्टील प्लांट (डीएसपी) आणि ईस्टर्न कोलफिल्ड्सने लोकांच्या पिण्याच्या पाणीची अडचण होऊ नये, म्हणून टँकर सुरू केले आहेत.

लॉक गेटचे नुकसान झाल्यानंतर पाणीटंचाईमुळे दुर्गापूर प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने वीज निर्मितीचे नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर धरणाच्या लॉक गेटचा काही भाग खराब झाल्याने पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील सखल भागात पूरस्थितीच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. राज्याच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुर्गापूर धरणाच्या 31 लॉक गेटला मोठे नुकसान झाले आणि आता ते काम करत नाही. यामुळे पाण्याचा प्रवाह तपासणे शक्य झाले नाही. येथून सातत्याने प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर येत असल्याने आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण होते.

हेही वाचा -फेसबुकवर महिलेशी मैत्री करणे पडले 40 लाखात, दिल्लीतून सात आरोपींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details