उन्नाव : बांगरमाऊ कोतवाली परिसरात एका दलित अल्पवयीन तरुणीवर क्रूरतेने अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. रिपोर्टनुसार, मुलीच्या डोक्याची हाडं तुटलेली आढळली आहेत. तिच्या शरीरावर 8 ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. अनेक ठिकाणी खोल जखमाही आढळून आल्या आहेत. डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर हत्या करण्यात आल्याचंही सांगण्यात येत ( Unnao Rape Case ) आहे. चोवीस तास उलटूनही पोलिसांना आरोपी सापडलेला नाही.
रविवारी रात्री घरातून बेपत्ता झालेल्या दलित तरुणाचा मृतदेह घरापासून सुमारे 1 किमी अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला आढळून आला. मुलीच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. याशिवाय मानेवर जखमेच्या खोल खुणाही होत्या. कुटुंबीयांनी गावातील तरुणावर बलात्कारानंतर खून केल्याचा आरोप केला होता. एसपी उन्नाव दिनेश त्रिपाठी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना लवकरच खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले. अतिरिक्त एसपींच्या म्हणण्यानुसार तहरीरच्या आधारे खुनाचा गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.